गंगापूर, (प्रतिनिधी): लासूर स्टेशन येथून जवळच असलेल्या डोणगाव (ता. गंगापूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयास गावकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी टाळे ठोकले.
सरकारी कर्मचारी मुख्यालयी न राहणे, गावातील लोकांना तुम्हाला हक्काची जागा देतो असे म्हणून माजी सरपंच व माजी ग्रामसेवक यांनी पदावर नसताना गावकऱ्याकडून मोठी रक्कम घेऊन बोगस नमुना नंबर ८ अ देऊन त्यांची फसवणूक केलेली आहे. फसवणूक झालेल्यांचे पैसे परत मिळालेच पाहिजेत, सरकारी भूखंड घोटाळा चौकशी, गटविकास अधिकारी यांच्या टेबलावर असताना चौकशीला घाबरून रजेच्या निमित्ताने सध्या कार्यरत ग्रामसेवकाने चौकशीपासून पलायन करणे, ग्रामसेवक हजर नसल्यामुळे मागील दहा दिवसांपासून ग्रामस्थांची होणारी अडचण आणि अनेक
समस्यांना सामोरे जावे लागते, या सर्व प्रकारांना कंटाळून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला आज कुलूप ठोकले.
ग्रामस्थांच्या वरील सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा मोठे आंदोलन करणार आहे. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, कार्यकारी अधिकारी छत्रपती संभाजीनगर, गटविकास अधिकारी गंगापूर, पंचायत समिती सभापती गंगापूर यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी ज्ञानेश्वर महाराज, आबासाहेब डोणगावकर, हिरचंद बहूरे राजपूत, भीमभाऊ आहेर, तक्रारदार अप्पासाहेब हरकळ, ज्ञानेश्वर खिल्लारे, नारायण हरकळ, रामभाऊ सारंगधर, रामचंद सागरे, अशोक सागरे, बाबुराव जाधव, शांतीलाल नवले व ग्रामस्थ उपस्थित होते.












